
बनावट नावाने कंपनी सुरू करून सायबर ठगांना बँक खाती पुरवल्या प्रकरणी एकाला डी.बी. मार्ग पोलिसांनी अटक केली. पहाडराम जुठाराम पुरोहित असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईल, सीम कार्ड, 5 बँकांचे डेबिट कार्ड, 6 चेकबुक केले. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. तक्रारदार हे गिरगाव परिसरात राहतात. 14 मे रोजी अज्ञात व्यक्तीने त्याच्या खात्यातून पैसे काढले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. तपासा दरम्यान पोलिसांनी बँक खात्याचा तपशील तपासला. ते खाते एका कंपनीचे असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.