अर्थवृत्त

घर खरेदीत वृद्धांचा वाटा वाढला!

मुंबईत घर खरेदी करणे आता भल्याभल्यांना परवडणारे नाही. घरांच्या किमती अवाच्या सवा वाढल्या आहेत. त्यामुळे नोकरी लागल्यानंतरही घरांच्या किमती पाहून तरुणांची घर घेण्याची हिंमत होत नाही. परंतु मुंबईत घर खरेदी करण्यात वृद्ध व्यक्तींचा वाटा वाढला आहे, अशी माहिती नाइट फ्रँक इंडियाच्या एका सर्व्हेतून समोर आली आहे. मुंबईत साठी ओलांडलेल्या खरेदीदारांची एकूण मालमत्ता नोंदणीचा वाटा 204 टक्क्यांनी वाढला आहे.

2020 मध्ये 7 हजार 554 संख्या होती. ती आता 2024 मध्ये 15 हजार 276 वर पोहोचली आहे. या वर्षीच्या पहिल्या सात महिन्यांत म्हणजे जानेवारी ते जुलै 2024 मध्ये शहरातील एकूण 84,866 मालमत्ता नोंदणींपैकी जवळपास 18 टक्के वयोवृद्धांनी मालमत्ता खरेदी केल्या आहेत. मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांच्या मालमत्तेची नोंदणी 2024 च्या अखेरीस 23 हजारांच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे. 18 ते 29 या वयोगटातील व्यक्तींनी 9 टक्के, 45 ते 60 या वयोगटातील व्यक्तींनी 33 टक्के मालमत्ता खरेदी केली.

रवीना ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

संजय घोडावत ग्रुपच्या एफएमसीजी कंपनीने बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनची स्टार ब्रँड रिफाइंड ऑइलसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली. या वेळी घोडावत कंझ्युमर लिमिटेडच्या संचालक सलोनी घोडावत उपस्थित होत्या.

आरव्हीएनएलचा करार

रेल विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) या नवरत्न सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने पटेल इंजिनीअरिंग लिमिटेडसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारामुळे कंपन्यांना विविध क्षमतांमध्ये सहकार्याच्या संधींचा पाठपुरावा करता येईल.

क्रॉम्प्टनचे ब्लेण्डर लाँच

क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने एमिओ ब्लेण्ड न्यूट्रि ब्लेण्डर लाँच केले. या ब्लेण्डरची किंमत 4800 रुपये आहे. हे प्रोडक्ट सर्व क्रॉम्प्टन ऑथोराइज्ड रिटेल आऊटलेट्स व आघाडीच्या ईकॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असून, ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करतो.

बिर्ला एचआयएल पाईप्स

बिर्ला एचआयएल पाईप्सने प्लम्बिंग सोल्यूशन्सचे टफिट लीक-प्रूफ तंत्रज्ञान सादर केले. लीक-प्रूफ सोल्यूशन्स प्रदान करणारे हे तंत्रज्ञान उच्च-गुणवत्तेचे पाईप्स आणि त्यांची फिटिंग टिकाऊ व कार्यक्षम करण्यास मदत करते. व्यावसायिक वापरासाठी उत्पादनांची विस्तृत सेवा प्रदान करते.

रणबीर कपूर सियाराम्सचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

सुटिंग्स, शर्टिंग्स फॅब्रिक्स आणि फॅशन कपड्यांच्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या सियाराम्सने बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले. या वेळी सियाराम्सचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक रमेश पोद्दार उपस्थित होते. पाच दशकांचा वारसा लाभलेल्या सियाराम्सने उच्च दर्जाची उत्पादने, सततचे नवोपक्रम आणि आंतरराष्ट्रीय आधुनिक डिझाइन यांचे प्रतीक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. सियाराम्स कुटुंबाचा एक भाग बनून मला अत्यंत आनंद होत आहे आणि एका अर्थाने हे घरी परतल्यासारखे वाटत आहे, असे रणबीर कपूर म्हणाला.

निखिल प्रोडक्ट्सच्या अगरबत्त्या

बंगळुरूच्या निखिल प्रोडक्ट्सने गणपती, दसरा, दिवाळी या सणांचे औचित्य साधून केसर आराध्य, वंदन आणि याज्ञिक नॅचरल मसाला अगरबत्ती बाजारात आणली आहे. यातील आराध्य ही अगरबत्ती उच्च प्रतीच्या चंदन व ऊद यांच्या अत्तरपासून बनवलेली आहे, तर वंदन ही अगरबत्ती उच्च प्रतीच्या चंदनाच्या अत्तरापासून बनवलेली आहे. याज्ञिक नॅचरल मसाला अगरबत्ती एका अनोख्या उच्च दर्जाच्या नैसर्गिक जडीबुटी आणि उच्च दर्जाच्या सुगंधी अर्काच्या मिश्रणातून बनवलेली आहे. या अगरबत्त्या आकर्षक पॅकिंगमध्ये मुंबई, ठाणे, कोकण, पुणे, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध आहेत.

महाराजाची नवी अगरबत्ती

महाराजा अगरबत्ती कंपनीने वास्तुयंत्र आणि हरी पानडी प्युअर ब्रँडची अगरबत्ती बाजारात आणली आहे. या अगरबत्तीला नैसर्गिक सुगंध आहे. या अगरबत्तीच्या मनमोहक सुगंधाने देवाची प्रार्थना करताना मन अगदी प्रसन्न राहते. ही अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. कंपनीचा लोगो पाहून अगरबत्ती खरेदी करावे असे कंपनीने म्हटले आहे.

एसपी जैन ग्रुपचा विस्तार

एसपी जैन ग्रुपने कॅलिफोर्नियाच्या मिरामार युनिव्हर्सिटीचे अधिग्रहण केल्याची घोषणा केली. यामुळे आता विद्यार्थ्यांना सिंगापूर, दुबई, सिडनी, हिंदुस्थान, लंडन आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या कॅम्पसमध्ये शिक्षण घेता येणार आहे. अमेरिकी डिग्रीसोबत पदवीचाही पर्याय उपलब्ध झाला आहे. या निर्णयामुळे सिलिकॉन व्हॅली आणि एआय शिक्षणाबद्दल आमची वचनबद्धता आणखी मजबूत झाली आहे, असे नितीश जैन म्हणाले.

बैद्यनाथ एनएनजी स्टेशन

पर्यावरणपूरक बैद्यनाथ एलएनजीचे उमरेड रोडवरील तिसरे डिस्पेंसिंग स्टेशनचे लाँचिंग केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी वोल्वो आयशरचे डेप्युटी सीईओ राजिंदर सिंह सचदेवा, बैद्यनाथ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सुरेकुमार शर्मा, प्रणव शर्मा, कल्पना शर्मा, श्रुती शर्मा, बी-एलएनजीचे सीईओ सुब्बाराव आदी उपस्थित होते.