Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 28 मार्च 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

आजचे पंचाग

तिथी – फाल्गुन कृष्ण चतुर्दशी
वार -शुक्रवार
नक्षत्र – पूर्वाभाद्रपदा
योग – शुक्ल
करण – विष्टि,चतुष्पाद
राशी – कुंभ, 4.48 नंतर मीन

मेष

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात नंतर व्यय स्थानात भ्रमण, राहू व्ययात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – संमिश्र दिवस, लाभ होतील, खर्चही वाढणार आहे.
आरोग्य – मनात अस्वस्थता राहण्याची शक्यता
आर्थिक – खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे
कौटुंबीक वातावरण – वादविवादापासून दूर राहा

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात नंतर आय स्थानात भ्रमण, राहू आय स्थानात, शनी कार्यस्थानात
आजचा दिवस – संध्याकाळनंतरचा दिवस सकारात्मक आहे
आरोग्य – आरोग्य उत्तम राहणार आहे
आर्थिक – कार्यसाफल्याने लाभ दृष्टीपथात येतील
कौटुंबीक वातावरण – घरातील कुरबुरी टाळाव्यात.

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्राचे भाग्य स्थानात भ्रमण नंतर चंद्र कर्म स्थानात, कर्म स्थानात राहू, भाग्यात शनी
आजचा दिवस – संध्याकाळपर्यंत महत्त्वाची कामे पूर्ण करावीत.
आरोग्य – धावपळ-दगदग टाळावी
आर्थिक – दिवसाचा पूर्वाध लाभाचा ठरेल
कौटुंबीक वातावरण – कुटुंबीयांशी वादविवाद टाळण्याची गरज

कर्क

ग्रहस्थिती – चंद्राचे अष्टम स्थानात, नंतर भाग्य भ्रमण, भाग्यात राहू, अष्टमात शनी
आजचा दिवस – दिवसाचा उत्तरार्ध फायद्याचा ठरेल
आरोग्य – दडपण दूर झाल्याने समाधान मिळेल
आर्थिक – संपत्तीबाबत मोठे निर्णय होण्याची शक्यता
कौटुंबीक वातावरण – संध्याकाळ नंतर घरात उत्साहाचे वातावरण असेल

सिंह

ग्रहस्थिती – चंद्राचे सप्तम स्थानात नंतर अष्टम भ्रमण, अष्टमात राहू, सप्तमात शनी
आजचा दिवस – दिवसाचा पूर्वाधात सहकाऱ्यांच्या मदतीने कामे मार्गी लागतील
आरोग्य – अस्वस्थता जाणवण्याची शक्यता
आर्थिक – महत्त्वाचे व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबीक वातावरण – संध्याकाळपर्यंतचा दिवस समाधानात जाणार आहे.

कन्या

ग्रहस्थिती – चंद्राचे षष्ठ स्थानात,नंतर सप्तम स्थानात भ्रमण, सप्तमात राहू, षष्ठात शमी
आजचा दिवस – संयमाने वागल्यास सहकार्य मिळणार आहे.
आरोग्य – मरगळ दूर होणार आहे.
आर्थिक – भागीदारी व्यवहारात चांगल्या संधी मिळतील
कौटुंबीक वातावरण – जोडीदारामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहणार आहे

तूळ

ग्रहस्थिती – चंद्राचे पंचमात भ्रमण नंतर षष्ठ स्थानात, षष्ठात राहू, पंचमात शनी
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र आहे
आरोग्य – विनाकारण थकवा जाणवण्याची शक्यता
आर्थिक – व्यवहारात काळजी घ्या
कौटुंबीक वातावरण – वादविवाद टाळल्यास दिवस शांततेत जाणार आहे.

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्राचे चतुर्थ स्थानात नंतर पंचम स्थानात भ्रमण, पंचमात राहू, चतुर्थात शनी
आजचा दिवस – दिवस सकारात्मक आहे
आरोग्य – आजारपणापासून मुक्ती मिळणार आहे
आर्थिक – मुलांसाठी खरेदी करावी लागेल
कौटुंबीक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल

धनु

ग्रहस्थिती – चंद्राचे तृतीय स्थानात नंतर चतुर्थ स्थानात भ्रमण, राहू चतुर्थात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – घरात मागलिक कार्यक्रमाची शक्यता असल्याने उत्साह असेल
आरोग्य – कुटुंबीयांच्या प्रकृतीची काळजी घ्या
आर्थिक – घरासाठी महत्त्वाच्या वस्तूंच्या खरेदीचे योग आहेत
कौटुंबीक वातावरण – घरात उत्साहाचे वातावरण असेल

मकर

ग्रहस्थिती – चंद्राचे द्वितीय स्थानात नंतर तृतीय स्थानात भ्रमण, राहू तृतीय स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आज दिवसात शुभ घटनांचा लाभ होईल
आरोग्य – उत्तम राहणार आहे. विविध कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा असेल
आर्थिक – भावंडाकडून लाभ होण्याची शक्यता
कौटुंबीक वातावरण – नातेवाईकांच्या भेटीने आनंद होणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्राचे प्रथम स्थानात नंतर द्वितीय भ्रमण, राहू द्वितीय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – कुटुंबीयांकडून लाभ होण्याची शक्यता
आरोग्य – डोळ्यांची काळजी घ्या
आर्थिक – आर्थिक फायदा होण्याचे योग आहेत
कौटुंबीक वातावरण – कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे.

मीन

ग्रहस्थिती – चंद्राचे व्यय स्थानात नंतर प्रथम स्थानात भ्रमण, राहू प्रथम स्थानात, शनी व्यय स्थानात
आजचा दिवस – वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे
आरोग्य – जुन्या आजारपणातून बरे वाटेल
आर्थिक – दिवसाच्या पूर्वार्धात आर्थिक व्यवहारात काळजी घ्या
कौटुंबीक वातावरण – संयमाने वागल्यास दिवस समाधानात जाणार आहे.