पराभवानंतर डेन्मार्कच्या पंतप्रधानांचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सार्वत्रिक निवडणुकीत पराभव झाल्यानंतर डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे फ्रेडेरिक्सन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मतमोजणीत त्यांच्या सोशल डेमोव्रॅटिक पक्षाला केवळ 38 जागा मिळाल्या आहेत. मेटे या जून 2019 पासून डेन्मार्कच्या पंतप्रधान होत्या. 2022 मध्ये त्या पुन्हा सत्तेत परतल्या होत्या. अवघ्या 41 व्या वर्षी पदभार स्वीकारणाया त्या देशातील सर्वात तरूण पंतप्रधान बनल्या होत्या. मेटे या स्पष्टवत्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. जानेवारी 2026 मध्ये त्यांनी ट्रम्प यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. तसेच ग्रीनलँडच्या संरक्षणासाठी डॅनिश कमांडो आणि सैनिक तैनात केले होते.