तापामुळे जकार्ता एशियाडचे वैयक्तिक पदक गमावले -दत्तू भोकनळ

महाराष्ट्राच्या दत्तू भोकनळ याने नौकानयनाच्या (रोईंग) स्पर्धेत वैयक्तिक पदक गमावले, मात्र सांघिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले

सामना ऑनलाईन, जाकार्ता

2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये नौकानयन (रोविंग) प्रकारात महाराष्ट्राच्या दत्तू भोकनळचे पदक अवघ्या 6 सेकंदांच्या फरकाने गेलं होतं. इंडोनेशियातील आशियाई क्रीडा स्पर्धेत तापामुळे मला सर्वोत्तम कामगिरी साकारता आली नाही. त्यामुळेच वैयक्तिक पदक गमावले असे स्पष्टीकरण रोव्हर दत्तू भोकनळ याने केले आहे. कोलकाता रोविंग क्लबतर्फे दत्तूचा सन्मान करण्यात आला, यावेळी तो पत्रकारांशी बोलत होता. इंडोनेशियात पार पडलेल्या आशियाई खेळांमध्येही दत्तूकडून सर्वांना पदकाची आशा होती. दत्तूने सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करून सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र वैयक्तिक प्रकारात पदकाने दिलेली हुलकावणी त्याला अजूनही बोचत आहे.