ड्रग माफियांविरुद्धची कारवाई पथ्यावर,दया नायक यांना बढती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,मुंबई

एकेकाळचे चकमकफेम फौजदार दयानंद बंडा नायक यांची अलीकडील ड्रग माफियांविरुद्धची कठोर कारवाई पाहून त्यांच्या बढतीचे मार्ग मोकळे झाले असून त्यांना नुकतीच पोलीस निरीक्षक म्हणून बढती देण्यात आली आहे. पोलीस खात्यातील अंतर्गत वादामुळे 1995 सालच्या दया नायक यांची बढती रोखली गेली होती; परंतु आंबोली पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या दया नायक यांनी गेल्या वर्षभरात नेत्रदीपक कामगिरी केली. अपहरण करण्यात आलेल्या व्यापाऱ्याची गुंडांच्या तावडीतून सुटका करून त्यांचे प्राण वाचवले. कोटय़वधी रुपयांच्या अमली पदार्थांचा साठा पकडला. त्यामुळे दया नायक यांच्या अतुलनीय कामगिरीवर खूश असलेल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी नायक यांच्या बढतीच्या मार्गात असलेले सर्व अडथळे दूर करून त्यांना पोलीस निरीक्षक म्हणून बढती दिली आहे.