डीबीएस बँकेचा ग्राहकांना जोरदार झटका

 

डीबीएस बँक इंडियाने आपल्या ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. बँक ग्राहकांसाठी 1 ऑगस्ट 2025 पासून नवीन नियम लागू करणार आहे. या नियमांतर्गत ग्राहकांना बँक खात्यात कमीत कमी 10 हजार रुपये ठेवावे लागतील. जर बँकेत यापेक्षा कमी रक्कम असेल तर ग्राहकांना 500 रुपयांचा दंड लावला जाईल. डीबीएस बँकेने आपल्या ग्राहकांना एसएमएस पाठवून या नव्या नियमांची माहिती दिली आहे. बँकेने मिनिमम बॅलन्ससह एटीएममधून कॅश काढण्याच्या नियमातही बदल केला आहे.