मी बायसेक्शुअल आहे! महिला खासदाराची जाहीर कबुली

एका महिला खासदाराने ती बायसेक्शुअल असल्याची जाहीरपणे कबुली दिली आहे. एका मुलाखतीमध्ये या महिला खासदाराने आपण बायसेक्शुअल (महिला आणि पुरुष दोन्हींसोबत शारीरिक संबंध ठेवणारी व्यक्ती). ही पहिली वेळ आहे जेव्हा एखाद्या खासदाराने आपण बायसेक्शुअल ( bisexual) असल्याची अशा पद्धतीने जाहीरपणे कबुली दिली आहे.

डेहेन्ना डेव्हीसन (Dehenna Davison) असं या खासदाराचं नाव असून त्या इंग्लंडमधील हुजूर पक्षाच्या ( Conservative Party ) खासदार आहेत. 28 वर्षांच्या डेहेन्ना या 2019 सालची निवडणूक जिंकून खासदार बनल्या होत्या. सोमवारी त्यांनी जीबी न्यूज या माध्यमसंस्थेला मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी म्हटले की ‘जर मला कोणी विचारलं तर मी ही गोष्टी लपविण्याचा अजिबात प्रयत्न करणार नाही, कारण यात लज्जास्पद काहीही नाहीये.’

डेहेन्ना यांची मजूर पक्षाच्या माजी खासदार ग्लोरिआ डी पिएरो यांनी मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की “2018 साली त्यांचं लग्न झालं होतं, मात्र काही महिन्यात त्यांचा घटस्फोट झाला. सध्या त्याचं एका पुरुषासोबत प्रेमप्रकरण सुरू असून आमचं सगळं मस्त सुरू आहे” मी काही पुरुष तसेच सुंदर मुलींसोबत डेटवरही गेले होते असंही डेहेन्ना म्हणाल्या. डेहेन्ना यांच्या या मुलाखतीनंतर त्यांना त्यांच्या मतासाठी आणि भूमिकेसाठी चहूबाजूने पाठिंबा मिळू लागला आहे. जो पाठिंबा या मुलाखतीनंतर आपल्याला मिळाला ते पाहून मी भारावून गेले आहे असं डेहेन्ना यांनी म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या