Election ; केजरीवालांसमोर भाजप आणि काँग्रेसने ‘यांना’ दिलीय उमेदवारी, लढत रंगतदार होणार

808

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात होणारी निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार आहे. या मतदारसंघातून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे उमेदवार अरविंद केजरीवाल निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस कोणाला उमेदवारी देतात याकडे अनेकांचे लक्ष लागलेले होते.

भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी या मतदारसंघात त्यांचे ताकदीचे उमेदवार उतरवले आहेत. काँग्रेसने रोमेश सभरवाल यांना उमेदवारी दिली आहे. दिल्ली पर्यटन विभागाचे अध्यक्ष, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे संचालक अशी पदे त्यांनी भूषविलेली आहेत. याशिवाय त्यांनी दिल्ली काँग्रेस तसेच युवक काँग्रेसच्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत.

romesh-sabharwal

भाजपने या मतदारसंघातून भाजपच्या युवा मोर्चाचे दिल्ली अध्यक्ष सुनील यादव यांना उमेदवारी दिली आहे. यादव हे पेशाने वकील असून त्यांना उमेदवारी देऊन भाजपने अनेकांना धक्का दिल्याचं बोललं जातंय. यादव यांच्याऐवजी इथून सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी, एकेकाळी आपमध्ये असलेले कुमार विश्वास यांना उमेदवारी दिली जाईल असं बोललं जात होतं. यादव यांना उमेदवारी दिल्यानंतर आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की भाजपने जो उमेदवार दिला आहे तो पाहिल्यानंतर त्यांनी लढाईपूर्वीच आत्मसमर्पण केलं आहे.

sushil-yadav-bjp-candodate

2013 च्या विधानसभा निवडणुकीत केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाने प्रस्थापितांना जबरदस्त हादरे देत संपूर्ण राज्य काँग्रेसकडून हिसकावून घेतलं होतं. केजरीवाल यांनी त्यावेळच्या मुख्यमंत्री शीला दिक्षित यांना मोठ्या फरकाने पराभूत केलं होतं. 2015 साली केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या बड्या नेत्या किरण वालिया यांनाही पराभूत केलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या