
दिल्लीच्या करोल बाग परिसरातील एक घर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 3 लोकांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. कोसळलेल्या घराच्या ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. दिल्लीच्या अग्निशमन दलाने शोधमोहिम आणि बचाव कार्यासाठी पाच गाड्या घटनास्थळी पाठवल्या. दिल्ली फायर ब्रिगेडला आज सकाळी 9.11 वाजता तीन मजली जुन्या इमारतीचा काही भाग आहे जो सकाळी कोसळला होता. हा अपघात अशावेळी झाला आहे. ज्यावेळी दिल्लीत मुसळधार पाऊस पडत आहेत. ही इमारत फार जुनी असून ती 25 चौरस यार्डच्या क्षेत्रफळावर पसरलेली आहे. या दुर्घटनेनंतर आतापर्यंत 12 लोकांना वाचविण्यात यश आले आहे.
3 people have died and and 14 injured in house collapse incident in Karol Bagh, say Delhi Police https://t.co/n1SywDixLb
— ANI (@ANI) September 18, 2024