
दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित हल्लेखोर डॉ. उमर उन नबी याच्या दुसऱ्या कारचा अखेर शोध लागला आहे. उमरची रेड फोर्ड इकोस्पोर्ट ही गाडी बुधवारी हरियाणाच्या खंडावली गावाजवळ पार्क केलेली आढळली. ही गाडी डॉ उमरच्या मालकीच्या खंडावली येथील घराबाहेर पार्क केलेली आढळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कारची तपासणी करून ती जप्त करण्यात आली असून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. दिल्ली पोलीस आणि इतर केंद्रीय संस्थांना माहिती देण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी आजूबाजूचा परिसर रिकामा केला आहे. या कारची 22 नोव्हेंबर 2017 रोजी दिल्लीतील राजौरी गार्डन आरटीओमध्ये नोंदणी करण्यात आली होती. ही कार उमर उन नबी उर्फ उमर मोहम्मद याच्या नावाने खरेदी करण्यात आल्याचे तपासात असे दिसून आले आहे.


























































