Delhi Blast Update- डॉ. शाहीनकडे होती डॉक्टरांचे ब्रेनवॉश करण्याची जबाबदारी, NIAच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड

दिल्लीत झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर तपास यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. दररोज नवीन माहिती समोर येत आहेत. पोलिसांनी आत्तापर्यत अनेक ठिकाणी छापे टाकले असून अनेक लोकांना अटक केली आहे. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात अटक केलेले मुझम्मिल, डॉ. शाहीन आणि डॉ. आदिल सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्य़ांच्या चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉ. शाहीन यांना उत्तर प्रदेशातील डॉक्टरांचे ब्रेनवॉशिंग करण्याचे काम देण्यात आले होते हे समोर आले आहे.

अलि़कडेच चौकशीदरम्यान डॉ उमर, मुझम्मिल यांच्या मोबाईलमध्ये 200 हून अधिक व्हिडीओ सापडले होते. यासंदर्भात चौकशी सुरू असताना आता डॉ. शाहीनबाबत धक्कादायक माहिती समोर येतेय. बॉम्ब स्फोटातील आरोपी डॉ शाहीन यांना उत्तर प्रदेशातील डॉक्टरांचे ब्रेनवॉश करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. कानपूर आणि सहारनपूरमधील तीन डॉक्टर डॉ. शाहीनच्या संपर्कात होते. हे तीन डॉक्टर शाहीनच्या संघटनेत सामील होणार होते. शाहीन या डॉक्टरांना तीन-चार वेळा भेटली. याबाबत माहिती मिळताच या प्रकरणात जलद कारवाई करत देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांना अटक करण्यात आली.

कानपूर आणि सहारनपूर येथील तीन डॉक्टरांची चौकशी केली जात आहे. उत्तर प्रदेश एटीएस आणि एनआयएच्या या चौकशीत हे तीन डॉक्टर अनेक धक्कादायक माहिती उघड करू शकतात. त्यामुळे आता दिल्ली बॉम्बस्फोटानंतर, तपास यंत्रणा दहशतवादी नेटवर्कचा वेगाने उलगडा करत आहेत.

Delhi Blast Update – दहशतवादी भाषणे आणि बॉम्ब बनवण्याची ट्रेनिंग! डॉ. मुजम्मिलच्या मोबाईलमध्ये सापडले शेकडो पुरावे