डबल इंजिन सरकार म्हणजे महागाई आणि बेरोजगारी असा हल्लाबोल दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. तसेच मी पंतप्रधान मोदींचा प्रचार करेन पण त्यांनी एक मागणी मान्य करावी असे आव्हानही केजरीवाल यांनी भाजपला दिले आहे.
दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमवर केजरीवाल यांनी सभा घेतली. तेव्हा केजरीवाल म्हणाले की गेल्या 10 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीच केले नाही. पुढच्या वर्षी मोदी 75 वर्षांचे होतील तेव्हा तरी त्यांनी काही कामं करावीत. केजरीवार यांनी पंतप्रधान मोदींना आव्हान दिले की दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी जर पंतप्रधान एनडीए शासित 22 राज्यात मोफत वीज देण्याची घोषणा करतील तर मी भाजपसाठी प्रचार करेन असे केजरीवाल म्हणाले.
📍 जनता की अदालत, छत्रसाल स्टेडियम, दिल्ली@ArvindKejriwal जी की PM मोदी को चुनौती👇
“मोदी जी, फ़रवरी में दिल्ली का चुनाव है। 22 राज्यों में BJP की सरकार है। इन राज्यों में बिजली Free कर दो, मैं दिल्ली चुनाव में मोदी जी का प्रचार करूँगा।”#JantaKiAdalatMeinKejriwal pic.twitter.com/nhBmwH2URL
— AAP (@AamAadmiParty) October 6, 2024
हरयाणा आणि जम्मू-कश्मीरमध्ये भाजपचं डबल इंजिन सरकार संपणार आहे असे केजरीवाल म्हणाले. तसेच झारखंड आणि महाराष्ट्रात हेच होणार आहे. डबल इंजिन सरकार म्हणजे महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आहे हे लोकांना कळून चुकलंय असे केजरीवाल म्हणाले. दिल्लीत येऊन भाजपचे लोक म्हणतील की डबल इंजिन सरकार बनवा, तेव्हा त्यांना विचारा की 10 वर्ष हरयाणात डबल इंजिन सरकार होतं तर त्यांनी काय केलं.