दिल्लीत दिवाळीत फटाक्यांवर बंदी कायम, आतिशी सरकारने जारी केले आदेश

दिल्लीकरांना यंदाची दिवाळीही फटाक्यांशिवाय साजरी करावी लागणार आहे. दिल्लीत दिवाळीत फटाक्यांवर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. दिल्लीच्या प्रदूषण नियंत्रण समितीने दिल्लीत सर्व प्रकारच्या फटाक्यांची निर्मीती, विक्री आणि ऑनलाईन विक्रीवर बंदीचे आदेश आतिशी सरकारने जारी केले आहेत. हा आदेश 1 जानेवारी 2025 पर्यंत लागू राहील.

दिल्लीच्या आसपासच्या परिसरात चारा जाळण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. चारा जाळल्याने प्रदूषणाच्या पातळीत वाढ होते. दसऱ्याला प्रदुषणाच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. दिल्लीचा सरासरी हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) शनिवारी 155 होता, जो रविवारी 224 वर गेला. या स्तराची हवा दुषित श्रेणीत येते. राजधानी दिल्लीत आता वाऱ्याचा वेग मंदावला आहे , यात आता लवकरच दिल्लीच्या हवेत चाऱ्याच्या धुराचे परिणाम दिसू लागले. त्यामुळे दिल्लीची हवा दुषित होण्याची शक्यता आहे.

दिल्लीत प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारने यंदा 21 सूत्रीय कार्यक्रम तयार केला आहे. यामध्ये फटाक्यांवर बंदी, सम विषम पद्धत लागू करण्याबरोबरच कृत्रिम पाऊस पाडण्याची योजना आखली आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी नुकतेच म्हणाले होते की, बंदी कडक अंमलबजावणी करण्यासाठी दिल्ली पोलीस, डीपीसीसी आणि महसूल विभागाने यांच्यासोबत कृकी आराखडा तयार केला जाईल. ऑक्टोबरमध्ये दिल्लीची हवा खराब व्हायला लागते. यामागे दोन कारणे आहेत. या दरम्यान तापमान वाढल्याने हवेच्या वेगावर परिणाम होतो. तर दिल्लीच्या जवळपास हरयाणा आणि पंजाबमध्ये चारा जाळल्याने प्रदूषणाच्या पातळीत वाढ होते.