10 वर्षांची डिझेल, 15 वर्षांची पेट्रोल कार जप्त होणार; दिल्ली सरकारने घेतला मोठा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील रहिवाशांकडे 10 वर्षे जुनी डिझेल कार किंवा 15 वर्षांपेक्षा जुनी पेट्रोल कार असेल, तर त्यांची अडचण वाढणार आहे. दिल्लीच्या सार्वजनिक वाहतूक विभागाने असा निर्णय घेतलाय की, अशी रस्त्यावर आढळणारी वाहने जप्त केली जातील आणि ती रद्द केली जातील.

दिल्ली वाहतूक विभागाने 14 फेब्रुवारी रोजी एक सार्वजनिक सूचना जारी करून असा इशारा दिला की, रस्त्यावर पार्क केलेले किंवा धावणारे कोणतेही जुने वाहन कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय स्क्रॅप केले जाईल. दिल्ली सरकारच्या मते, दिल्लीमध्ये वायुप्रदूषण मानकांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. या मानकांनुसार, 10 वर्षांपेक्षा जुनी डिझेल वाहने आणि 15 वर्षांपेक्षा जुनी पेट्रोल वाहने एंड ऑफ लाइफ श्रेणीत येतात.

ही कारवाई टाळण्यासाठी, दिल्ली वाहतूक विभागाने जुन्या वाहनांच्या मालकांना ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेण्याचे आणि त्यांची वाहने दिल्लीबाहेर नेण्याचे आवाहन करणारी नोटीस जारी केली आहे.