दिल्लीत 14 हजार लिटर नकली कोल्ड्रिंक जप्त

दिल्ली पोलिसांनी नकली पदार्थ बनवणाऱया टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी कारवाई करत 14 हजार लिटर नकली कोल्ड्रिंग जप्त केले आहे. तसेच एक्सपायरी डेट उलटून गेलेले फूड पॅकेट्स, चॉकलेट, बेबी प्रोडक्ट ताब्यात घेतले आहेत. दिल्ली- एनसीआर भागातून सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली आणि परिसरात स्वस्त दरात खाद्यपदार्थ विकले जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी फॅक्टरीवर धडक कारवाई करत मोठा माल पकडला. उत्पादनांची एक्सपायरी डेट संपली होती तरी मशिनींच्या मदतीने त्यावर नवी तारीख टाकली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली.