
टपाल विभागाने इनलॅण्ड स्पीड पोस्टसाठी 1 ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या नवीन दरांची घोषणा केली आहे. नवीन दरपत्रकानुसार, इनलॅण्ड स्पीड पोस्ट (डॉक्युमेंट) देशात कोठेही पाठवण्यासाठी 47 रुपये हा मूलभूत दर असेल. हे दर 50 ग्रॅमपर्यंतच्या डॉक्युमेंट/पत्र/नोटीस यासाठी लागू आहेत. यानंतर अंतर वाढेल तसे दरदेखील वाढत जातील. याआधी हा दर 35 रुपये होता.
टपाल खात्याने स्पीड पोस्ट सेवेत नवीन बदल जाहीर केले आहेत. यामध्ये ओटीपी-आधारित सुरक्षित वितरण, ऑनलाईन पेमेंट सुविधा, एसएमएस-आधारित वितरण सूची, ऑनलाईन बुकिंग सेवा, रिअल टाइम वितरण अपडेट्स आणि युजर्ससाठी नोंदणीची सोय यांचा समावेश आहे.
स्पीड पोस्ट आता व्हॅल्यू अॅडेड सुविधांसोबत पाठवले जाऊ शकते. यामध्ये पार्सल फक्त रिसिव्हर किंवा त्याच्या अधिकृत व्यक्तीलाच मिळेल. यासाठी पाच रुपये अधिक जीएसटी शुल्क आकारले जाईल.
विद्यार्थ्यांच्या स्पीड पोस्ट सेवेवर 10 टक्के सवलत दिली जाईल. एकगठ्ठा स्पीड पोस्ट केल्यास 5 टक्के सवलत मिळेल.
स्थानिक भागातील स्पीड पोस्टचे दर
- 50 ग्रॅमपर्यंतच्या सामानासाठी 19 रुपये
- 51 ग्रॅम ते 250 ग्रॅमपर्यंतच्या सामानासाठी 24 रुपये
- 251 ग्रॅम ते 500 ग्रॅमपर्यंतच्या सामानासाठी 28 रुपये
201 ते 500 किमीपर्यंतच्या अंतरासाठी
- 50 ग्रॅमपर्यंतच्या पार्सलसाठी 47 रुपये
- 51 ग्रॅम ते 250 ग्रॅमपर्यंतच्या पार्सलसाठी 63 रुपये
- 251 ग्रॅम ते 500 ग्रॅमपर्यंतच्या पार्सलसाठी 75 रुपये




























































