रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नऊ उमेदवार निवडणूक लढवत होते. त्यापैकी सात उमेदवारांची डिपॉझिट रक्कम जप्त झाली आहे. नारायण राणे आणि विनायक राऊत हे दोन उमेदवार सोडले तर इतर 7 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. विनायक लहू राऊत यांना 15 हजार 769 मते मिळाली. मारूती जोशी यांना 9 हजार 873, राजेंद्र आयरेंना 7 हजार 856, अशोक पवार यांना 5 हजार 244, सुरेश शिंदे यांना 2 हजार 209, अनंत तांबे यांना 5 हजार 563 मते मिळाली. त्यामध्ये विनायक लहू राऊत यांनी लक्षवेधी मते घेतली तसेच नोटाला 11 हजार 516 मते पडली आहेत.
एकूण वैध मते 9 लाख 2 हजार 395 आहेत. या वैध मतांच्या 1/6 मते न मिळाल्याने सातजणांची प्रत्येकी 25 हजाराची अनामत रक्कम जप्त होणार आहे. त्यामुळे या उमेदवारांचे 1 लाख 75 हजार शासनदरबारी जमा होणार आहेत.