महापुराला मुख्यमंत्रीच जबाबदार,माहिती अधिकार कार्यकर्त्याचा आरोप

807

कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही ठिकाणी नदीपात्रालगत भागात असलेल्या पूररेषेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या सूचनेवरून डीपीनुसार बदल करण्यात आले, त्यामुळेच सांगली आणि कोल्हापुरात महापुराचे थैमान माजले होते. या महापुराला या सगळ्या घटनेला स्थानिक प्रशासन, पाटबंधारे विभाग आणि मुख्यमंत्रीच जबाबदार असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते सारंग यादवाडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

यादवाडकर म्हणाले, ‘सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी आलेल्या महापुरामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे, याला कारण आहे ते पूररेषेत करण्यात आलेला बदल. निळ्या आणि लाल पूररेषेत डीपीमध्ये बदल करण्यात आला. यासाठी स्थानिक प्रशासन, क्रेडाई या बिल्डर संस्थेतले काहीजण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांची भेट घेतली होती. त्यावेळी पूररेषा नदीच्या आतील भागात घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केल्याने जवळपास 500 हेक्टर (1235 एकर) जागेवर मोठय़ा प्रमाणावर बांधकामे करण्यात आली. मात्र, यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठय़ा प्रमाणावर पूर आला. याला स्थानिक प्रशासन, पाटबंधारे विभाग आणि मुख्यमंत्री जबाबदार आहेत,’ असा आरोप यादवाडकर यांनी केला.

 

आपली प्रतिक्रिया द्या