युतीबाबात मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, वाचा सविस्तर बातमी

50984
file photo

भाजपची महाजनादेश यात्रा बीड जिल्ह्यामध्ये आली होती. या यात्रेनिमित्त बीड शहरात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली . या पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना भाजप युतीबाबत प्रश्न विचारण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रसारमाध्यमांनी युतीच्या बाबतीत खूप चर्चा केली होती. त्यावेळी आम्ही एका दिवसात युती करून त्याची घोषणाही करून टाकली होती. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही तसेच होईल ‘एका दिवसात युती आणि घोषणा’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये दाखल झाले होते. कालचा मुक्काम त्यांनी बीडमध्ये केला. सकाळी गेवराईकडे रवाना होण्यापूर्वी विश्रामगृहामध्ये बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. महाजनादेश यात्रेची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की या यात्रेने 1641 कि.मी.चा प्रवास पूर्ण केला आहे. 60 विधानसभा मतदारसंघात ही यात्रा पोहोचली आहे. अजून ही यात्रा 150 विधानसभा मतदारसंघामध्ये पोहोचणार आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भाजपातील मेगा भरतीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की जिथे आवश्यक वाटतात तेथे आम्ही प्रवेश देत आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मात्र मेगागळतीची चिंता आहे असा टोला फडणवीस यांनी हाणला.

आपली प्रतिक्रिया द्या