स्वातंत्र्यवीर सावरकरांची बॅरिस्टर पदवी ब्रिटिशांकडून परत मिळवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

देशाला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी हिंदुस्थानी तरुणांमध्ये स्वातंत्र्यलढय़ाचे स्फुल्लिंग चेतवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बॅरिस्टर आणि  बीए या दोन्हीही पदव्या  ब्रिटिशांनी काढून घेतल्या होत्या. त्यापैकी ‘बीए’ची पदवी मुंबई विद्यापीठाने परत केली. मात्र ‘बॅरिस्टर’ ही पदवी अद्याप परत मिळालेली नाही. ही पदवी परत मिळविण्यासाठी इंग्लंडच्या प्रशासनासोबत आवश्यक पत्रव्यवहार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

मुंबई विद्यापीठाने सुरू केलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास आणि संशोधन पेंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. त्यांच्या नावे सुरू होत असलेल्या संशोधन पेंद्राला निधी कमी पडू देणार नाही. मुंबई विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकरांची बॅरिस्टर पदवी परत मिळवण्याच्या कामात मदत करावी. त्याबाबत आवश्यक प्रस्ताव आणि कागदपत्रे सादर करावीत, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी राज्यपाल सी. पी. राधापृष्णन उपस्थित होते.