
सिद्धी गंधाले या विद्यार्थिनीच्या दुर्दैवी आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. सिद्धी गंधाले आत्महत्या प्रकरण पोलीस दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. या विद्यार्थिनीचा मृत्यू संशायस्पद असल्याचा पालकांचा आरोप आहे. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केली होती.
सिद्धी गंधाले मृत्यू प्रकरणात पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंदवला आहे. पण सिद्धी कोणत्याही मानसिक तणावात नव्हती. घटनेच्या रात्री तिचे चार मित्र सीसीटीव्हीमध्ये दिसत होते, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही याकडे सुनील प्रभू यांनी लक्ष वेधले.

























































