कोणार्क मंदिराच्या गाभाऱ्यात मिळणार भाविकांना प्रवेश, वाळू बाहेर काढण्याचे काम जोरात सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओडिशामधील 13 व्या शतकातील कोणार्क मंदिरातील गाभाऱ्यात आता भाविकांना प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंदिराच्या गर्भगृहात वाळू भरलेली असून ही वाळू बाहेर काढण्याचे काम जोरात सुरू आहे. मंदिराच्या मागील बाजूस 15 फूट उंचीची भिंत आहे. ही भिंत कोसळू नये, यासाठी इंग्रजांनी 1903 ते 1904 मध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात हजारो टन वाळू भरली होती. याला आता एक शतकाहून अधिक काळ लोटला आहे. त्यामुळे आतापर्यंत मंदिराच्या गर्भगृहात कोणीही जाऊ शकले नाही. परंतु आता गाभाऱ्यात भाविकांना जाता येणार आहे.

भारतीय पुरातत्त्व विभाग (एएसआय) आणि आयआयटी मद्रासच्या तंत्रज्ञांच्या 30 लोकांच्या टीमला ही वाळू काढण्याचे काम सोपवण्यात आले आहे. पूर्णपणे वाळू काढण्यासाठी 3 महिने लागतील. सर्व काही ठीक राहिल्यास, एक वर्षानंतर भाविकांना पहिल्यांदाच या ऐतिहासिक मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करता येईल. या मंदिरात दरवर्षी 35 लाखांहून अधिक पर्यटक येतात. देशातील एएसआय स्मारकांमध्ये ताजमहालनंतर हे मंदिर दुसऱ्या स्थानावर आहे. हे मंदिर 13 व्या शतकात राजा नरसिंह देव (प्रथम) यांनी 12 वर्षांत बांधले होते. हे सूर्य उपासनेसोबतच सागरी शक्तीचे प्रतीक आहे.