Dhurandhar 2- रणवीर सिंहला ‘भूत’ साकारण्यासाठी काय मेहनत घ्यावी लागली, जाणून घ्या या व्हायरल व्हिडीओमधून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्याच्या घडीला तिकीटबारीवर ‘धुरंधर द रिव्हेंज’ या चित्रपटाचा धुमाकूळ सुरु आहे. धुरंधरचे दमदार कथानक, जबरदस्त अॅक्शन आणि तांत्रिक बाबी अतिशय उत्तम पद्धतीने हाताळण्यात आल्या आहेत. रणवीर सिंह आणि त्याचा बालपणीचा मित्र या चित्रपटात भेटतात तेव्हा, रणवीर सिंहचा चित्रपटातील लूक पाहून अनेकांच्या काळजात धडकी भरते. हा लूक अनेकांना वाटले व्हीएफएक्सच्या माध्यमातून करण्यात आला आहे. परंतु हा लूक कुठलाही व्हीएफएक्सच्या माध्यमातून करण्यात आलेला नसून, हा लूक प्रोस्थेटिक मेकअपच्या माध्यमातून साकारण्यात आलेला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Preetisheel Singh (@preetisheel)

ख्यातनाम प्रोस्थेटिक मेकअप तज्ज्ञ प्रीतिशील सिंग हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओंतर्गत रणवीर सिंहचा एक भयानक भूताचा अवतार कसा करण्यात आला याबाबत माहिती देण्यात आली आहे.

हा जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ शेअर करताना, प्रीतिशील सिंगने एक मस्त कॅप्शन दिली आहे. या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ती म्हणते, जेव्हा एखाद्या व्यक्तीचे मन थकून जाते, तेव्हा खोट्या गोष्टींनाही खरे समजले जाते. रणवीर सिंहचा भूतासारखा असणारा हा भयानक लूक सध्याच्या घडीला चर्चेचा विषय बनला आहे.

चित्रपटातील हा रणवीरचा अवतार प्रेक्षकांसमोर येतो तेव्हा, दोन प्रमुख पात्रं, हमजा आणि पिंदा (जसकिरतचा मित्र), एकमेकांसमोर उभे ठाकतात. बालपणीचे मित्र असूनही, ते आता एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. या दोघांना एकमेकांविरोधात असताना रणवीरचे अक्राळ विक्राळ रुप समोर येते. एका दृश्यात, पिंदा नशेत असतो आणि त्याला भास होऊ लागतात. या दरम्यान, पिंदाला हमजाचा चेहरा राकट, त्याचे केस पांढरे आणि त्याच्या शिरा काळ्या दिसतात—जणू काही तो भूतच आहे.

धुरंधरच्या जगभरातील लोकप्रियतेमागील एक प्रमुख कारण म्हणजे टीमने प्रत्येक पात्राच्या रूपावर घेतलेली मेहनत. उदाहरणार्थ, रणवीर सिंगने जसकिरत सिंग रंगीच्या भूमिकेत विशीतील तरुणाची भूमिका साकारली आहे, तर हमजा अली माझारीने तिशी-चाळीशीतील मध्यमवयीन व्यक्तीची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील सर्वांच्या वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा आणि अगदी त्यांच्या शारीरिक रूपावर बारकाईने घेतलेली मेहनत खरोखर वाखाणण्याजोगी आहे.