‘धुरंधर-2’ यूटय़ूबवर लीक, तक्रार दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात धुमाकूळ घालत असलेला ‘धुरंधर-2’ चित्रपटाची एक पायरेटेड कॉपी यूटय़ूबवर प्रदर्शित झाली आहे. मोबाईलवर रेकॉर्ड केलेली ही आवृत्ती यूटय़ूबवर उपलब्ध झाल्यामुळे काही चाहत्यांनी याची माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून दिली आहे. तुमचा संपूर्ण चित्रपट यूटय़ूबवर अपलोड करण्यात आला आहे, कृपया संबंधिताविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.