
केंद्र सरकारने शनिवारी डिझेल आणि विमान इंधन (एटीएफ) वरील निर्यात शुल्कात मोठी वाढ केली आहे. डिझेलवरील विंडफॉल टॅक्स वाढवून प्रति लिटर 55.5 रुपये, तर एटीएफवर प्रति लिटर 42 रुपये करण्यात आला आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हे वाढीव दर तात्काळ लागू करण्यात आले आहेत.
याआधी 26 मार्च रोजी सरकारने डिझेलवर प्रति लिटर 21.50 रुपये आणि एटीएफवर 29.5 रुपये इतका निर्यात शुल्क लागू केला होता. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत इंधनाची उपलब्धता वाढवण्यासाठी हे शुल्क लावण्यात आले होते. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतीमुळे निर्यातदारांनी जास्त नफा मिळवू नये, यासाठीही हा निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान, 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर लष्करी हल्ले केल्यानंतर या संघर्षाला सुरुवात झाली होती. त्यानंतर तेहरानकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आणि संपूर्ण मध्यपूर्वेत तणाव वाढला. या संघर्षाचा परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावरही झाला.
मात्र, 8 एप्रिल रोजी इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमती झाली आहे. या युद्धामुळे जागतिक तेल बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली होती, ज्याचा परिणाम भारतासह अनेक देशांच्या इंधन धोरणांवर झाला आहे.
The export duty on diesel has been raised from ₹21.5 per litre to ₹55.5 per litre, while the export duty on ATF has been increased from ₹29.5 per litre to ₹42 per litre.
The export duty on petrol remains unchanged at nil. pic.twitter.com/yL8oGAFHyJ
— IANS (@ians_india) April 11, 2026























































