
लंडनच्या उच्चभ्रू हॅमरस्मिथ परिसरात पंजाबी रेस्टॉरंट मालक आणि पाकिस्तानी मुस्लिमांमध्ये हलाल मांसावरून वाद झाला. 16 वर्षांपासून रेस्टॉरंट चालवणाऱया हरमन कपूर यांनी सांगितले की, हलाल मांस विकण्यास नकार दिल्याने 100 पाकिस्तानी लोकांच्या गटाने त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला.
हरमन कपूर याने 14 मार्च रोजी त्याच्या रेस्टॉरंटवर एक बोर्ड लावला होता. रंगरेज रेस्टॉरंटमध्ये हलाल मांस मिळणार नाही, असे बोर्डवर लिहिले होते. त्यानंतर वाद सुरू झाला. पोस्टर लावल्यानंतर रेस्टॉरंटवर पाकिस्तानी लोकांची गर्दी जमा झाली.
हरमन म्हणाला, मला हलाल मांस विकण्यासाठी भाग पाडले जात आहे. माझा व्यवसाय वाचवण्यासाठी मला जगभरातील शिखांकडून मदत मागावी लागत आहे. हरमनने त्याच्यावर हल्ला झाल्याचे सांगितले. मी शस्त्राने स्वतःचा बचाव केला. माझ्या घरावरही कट्टरवाद्यांनी हल्ला केला. पोलिसांनीही कट्टरतावाद्यांना साथ दिली, असा आरोप हरमनने केला.
पोलिसांनी हरमन कपूरला अटक केली आणि चौकशीनंतर सोडून दिले.
























































