मनतरंग – गॅसलायटिंग

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

गॅसलायटिंगमध्ये शाब्दिक बाचाबाची, टीका आणि खिल्ली अशा गोष्टी तीव्र स्वरूपात असतात. अशा जहाल आणि जहरी बोलण्यामुळे समोरची व्यक्ती अतिशय दुखावली जाते आणि जर ती व्यक्ती संवेदनशील असेल तर नैराश्यातही जाऊ शकते. ‘मानसिक खच्चीकरणाचे’ असे काही गंभीर परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. यात विशेषत लहान मुले, तरुण वर्ग आणि महिलांचे प्रमाण जास्त आहे.

मेघाने (नाव बदलले आहे) काहीसा निश्चय करून समुपदेशनासाठी जाण्याचं ठरवलं होतं. चिंतन (नाव बदलले आहे), तिचा नवरा आणि तिचे सासू-सासरे या सगळ्यांबरोबर तिचे हल्ली खटके खूप उडत होते आणि त्यांचा तिच्यावर परिणाम व्हायला लागला होता. मेघा एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करत होती. पगारही तिला चांगलाच होता. प्रमोशनही नुकतंच झालं असल्यामुळे तिच्यावरची जबाबदारीही वाढलेली होती. त्यामुळे तिचा ऑफिसनंतरचा वेळही त्याच कामांमध्ये जात होता. त्यामुळे ‘फॅमिली टाइम’ किंवा ‘मी टाइम’ तिला असा नव्हताच. त्यातच अथर्व (नाव बदलले आहे), तिच्या मुलाकडेही लक्ष द्यायला तिला कधी कधी वेळ मिळायचा नाही.

“मान्य आहे मला की, मी मुलाला आणि घरच्यांना नाही काही दिवस वेळ देत आहे, पण काही दिवसांचाच तर प्रश्न आहे ना?’’ मेघा पोटतिडकीने सांगत होती. “मला तर इतकं घरच्यांनी गिल्ट दिलंय अथर्वला वेळ न दिल्याबद्दल की, मलाच आता स्वतबद्दल शंका यायला लागली आहे,’’ असं सांगून तिने तिची समस्या उघड करायला सुरुवात केली.

त्या दिवशी अथर्वची परीक्षा होती. चिंतनने तिला अभ्यास घ्यायला सांगितले. अथर्व थोडी टंगळमंगळ करतोय असा दिसताच मेघाने त्याच्या पाठीत धपाटा घातला. त्याबरोबर अथर्वने भोकाड पसरलं. त्याला रडताना बघून चिंतनचं डोकं फिरलं आणि तो मेघावर बरसला…“अगं… एवढय़ा लहान मुलावर हात कसा काय उगारलास?’’
“अरे, पण तुला दिसत नाहीये का की, हा किती टाईमपास करतोय ते?’’ मेघाही चिंतनवर ओरडली.
त्यात सासूबाईही तिला बोलू लागल्या. मेघाने स्वतची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला खरा; पण… “तरी मी म्हणत होतो की, जॉब नको करूस काही वर्षे. तुला पहिल्यापासून स्ट्रेस झेपत नाही आणि मल्टिटास्किंग तर त्याहूनही नाही.’’ चिंतनच्या बोलण्यातून जणू निखारेच बाहेर पडत होते.

स्वतची समस्या सांगताना तिने हेही ठळकपणे सांगितलं की, तिचं स्वतकडे लक्ष देणं हे तिच्या घरच्यांना ‘स्वार्थी’पणाचं लक्षण वाटायला लागलं होतं. तसंच तिचं ऑफिसच्या कामांमध्ये बिझी असणं हे तिचं घरातल्या कामांपासून आणि जबाबदाऱयांपासून ‘पळवाटीचं लक्षण’ मानलं जात होतं. त्यामुळे परिणाम असा होत होता की; मेघाची खिल्ली इतर नातेवाईकांसमोर उडवली जात होती. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केलंही, पण नंतर नंतर तिची चेष्टा करणं हे तिला अपमानास्पद वाटायला लागलं.

“अजून एक प्रसंग सांगते तुम्हाला. मला साधं राहायला आवडतं. माझ्या सासूबाईंना नटायची आवड आहे. मला त्याचं कौतुक होतं, पण आता ते बर्डन वाटायला लागलं आहे. कारण आम्ही गेल्या महिन्यात एका लग्नाला गेलो होतो त्या वेळी माझ्या सासूबाई त्यांच्या बहिणीला सांगत होत्या… ‘काही जणी साधंभोळं स्वतला दाखवण्याचा किती प्रयत्न करतात ना! हल्ली आम्हाला तो अनुभव येतोय.’ आणि माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखं करून निघून गेल्या. मला त्या दिवशी भरपूर हर्ट झालं. मी का देखावा करू?’’ मेघाच्या डोळ्यांतले अश्रू थांबत नव्हते.

मेघाला येत असलेला हा अनुभव ‘गॅसलाइटिंग’ या प्रकारातला होता. ही संज्ञा गंभीर प्रकारची असून तिला मानसशास्त्राrय भाषेत ‘मानसिक अत्याचार’ म्हणूनही संबोधले जाते. गॅसलाइटिंग हे मानवी नात्यांत (मग ते कुठलेही असो) आढळते आणि खासगी नातेसंबंधांत म्हणजे पती-पत्नी, भावंडांत किंवा पालक-मूल या प्रकारच्या नात्यांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते. गॅसलाईट याचा सोपा अर्थ बघायला गेला तर ‘नात्यामध्ये जेव्हा असमानता असल्यावर नात्यामधील कोणीएक व्यक्ती वरचढ होण्याचा प्रयत्न करते, त्या वेळी अशा व्यक्तीने दुसऱया व्यक्तीचा जाणूनबुजून केलेला उपहास, त्याला/तिला लागेल असं बोलणं. अशा वेळी दुसरी व्यक्ती स्वतवर शंका घेऊ शकते आणि तिचा आत्मविश्वास जाऊ शकतो. ‘मानसिक खच्चीकरण’ असंही याला आपण म्हणू शकतो.

गॅसलाइटिंगमध्ये शाब्दिक बाचाबाची, टीका आणि खिल्ली अशा गोष्टी तीव्र स्वरूपात असतात. अशा जहाल आणि जहरी बोलण्यामुळे समोरची व्यक्ती अतिशय दुखावली जाते आणि जर ती व्यक्ती संवेदनशील असेल तर नैराश्यातही जाऊ शकते. ‘मानसिक खच्चीकरणाचे’ असे काही गंभीर परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. माझ्या सत्रांमध्ये अशा अनेक केसेस आलेल्या आहेत, ज्या अशा गॅसलाइटिंगच्या कटू अनुभवांना सामोऱया गेलेल्या आहेत. ज्यामध्ये लहान मुलं, तरुण वर्ग आणि महिलांचे प्रमाण जास्त होते. महिलांबाबतीत म्हणायचे झाल्यास बऱयाच जणी या गॅसलाइटिंगच्या परिणामांना ‘युज्ड टू’ झालेल्या होत्या.

“मला असं युज्ड टू व्हायचं नाहीये मॅम.’’ मेघा सांगत होती. “मी इथे येण्याचं कारण म्हणजे मला नुकतंच ऑफिसमधून एका प्रेझेंटेशनमुळे खूप नावाजलं गेलं. माझ्या हुशारीला, साधेपणालाही तिथे मान दिला गेला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, मी कोणीतरी खास व्यक्ती आहे. मलाही स्वाभिमान आहेच. मग मी कशाला या नकारात्मक विचारांमध्ये अडकून स्वतची तब्येत बिघडवून घेऊ? हे सगळं मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं आणि तिने तुमचा रेफरन्स दिला. मला आता घरातल्या गॅसलाइटिंगला तोंड द्यायचंय. मला गाईड करा.’’ असं म्हणून तिने पाण्याचा ग्लास तोंडाला लावला आणि शांत बसली. तिच्या चेहऱयावर तेव्हा शांत भाव होते.

तिचं समुपदेशन सुरू झालं. सत्रांमध्ये तिच्या ‘विश्वास प्रणाली’वर काम करण्यास सुरुवात झाली, ज्यामध्ये बऱयाच ‘स्व’विषयी ज्या गैरसमजुती (मी अपयशी, मी नालायक, मी नाकर्ती) मोडीत काढल्या गेल्या, ज्या इतरांमुळे (चिंतन आणि सासू-सासरे) तयार झालेल्या होत्या. तिच्याशी बोलताना हेही लक्षात आलं की, ती अत्यंत भावनाप्रधान मुलगी होती आणि कायम दुसऱयांचा विचार करणारी होती, पण तिने ऑफिसच्या निमित्ताने बाहेरच्या जगाशी संपर्क आल्यावर स्वतला बदललं होतं, पण तरीही ‘इतरांच्या मान्यतेची’ वाट बघत पुढे जात होती. या तिच्या भावनिक अवलंबतेमुळे चिंतन जास्तीत जास्त वरचढ होऊ लागला होता. कारण त्याला माहीत होतं की, मेघाला कुठलंही काम केल्यावर मान्यता लागते, नाहीतर तिचा स्वतवरचा विश्वास डळमळतो.

त्यामुळेच तिच्या सत्रांमध्ये ‘व्यक्तिमत्त्व विकास’, रागाचे-दुःखाचे-तणावाचे व्यवस्थापन याही महत्त्वाच्या बाबींवर भर दिला गेला. मेघा नियमित सत्रांना येत होती आणि त्याचा तिला फायदा होत होता. आता ती मान्यता मिळवण्यासाठी ‘स्वतवर अवलंबून’ राहत होती. त्यामुळे कुठल्याही प्रसंगी ती शांत, संयमी होत चालली होती. तिच्या चेहऱयावरचे ‘लॉस्ट’ भाव कमी झालेले होते. “मी लॉस्ट नसते आणि बॅकअप प्लॅन्स ठेवते. चिंतन आता थोडा वचकून राहायला लागला आहे मला. बोलण्याआधी विचार करतोय.’’

हसत हसत मेघा ज्या दिवशी म्हणाली तेव्हा लक्षात आलं की, तिला आता समुपदेशनाची नाही, तर ‘स्वयंप्रेरणेची’ गरज आहे, ज्यात तिने बऱयापैकी प्रावीण्य मिळवले आहे.

[email protected]
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)