
- घरात गॅस गळती झाली असे वाटत असेल तर सर्वात आधी गॅस सिलेंडरचा नॉब बंद करा.
- गॅस गळतीनंतर लगेचच स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी घेऊन जा. घरात थांबू नका.
- घरात कोणतेही विद्युत उपकरण चालू किंवा बंद करू नका. स्पार्क होण्याची भीती असते.
- घरात हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या आणि दारे उघडी ठेवा. घरात कोणतीही ज्योत पेटवू नका.
- गॅस गळतीची माहिती स्थानिक गॅस कंपनी आणि अग्निशमन दलाला द्यायला विसरू नका.