
जर चुकून 500 रुपयांच्या बनावट नोटा मिळाल्या तर घाबरून जाण्याची गरज नाही. या नोटा खरंच बनावट आहेत का याची सर्वात आधी खात्री करा.
मार्केटमध्ये जाऊन त्या नोटा वापरण्याचे टाळा. कारण बनावट नोटा वापरणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. त्यामुळे अशा नोटा सर्क्युलेशनमध्ये आणणे टाळा.
बनावट नोट चलनात येणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे बनावट नोट ज्या बँकेत आपले खाते आहे, तेथे जाऊन जमा करा.
जर बँक राहत्या घरापासून दूर असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना सविस्तर माहिती द्या. अन्यथा तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो.
एटीएममधून बनावट नोटा मिळाल्यास तत्काळ त्या बँकेत जमा करा. एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही नोट दाखवा. एटीएममधील पावती जपून ठेवा.