सतत भूक लागतेय का, मग या सवयीवर कशी मात करायला हवी, जाणून घ्या

तुम्हालाही रिकामे बसल्यावर किंवा घरी असल्यावर सतत काही ना काही खाण्याची इच्छा होते का? होत असल्यास ही सवय अतिशय चुकीची आहे. यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचे विपरीत परीणाम होण्यास सुरुवात होते. रिकामे बसल्यावर सतत खाण्याची इच्छा होणे हे केवळ भुकेमुळेच नाही. तर सवय, ताणतणाव, अपुरी झोप किंवा चुकीच्या आहारामुळेही होते. काही सोप्या सवयी अंगीकारल्यास या सवयीवर सहज मात करता येऊ शकते.

हिवाळ्याच्या सीझनमध्ये लालचुटूक स्ट्राॅबेरी का खायला हवी, जाणून घ्या

पाणी पुरेसे प्या- अनेकदा तहान लागली असतानाही आपल्याला भूक लागल्यासारखे वाटते. त्यामुळे दर १–२ तासांनी पाणी प्या. खाण्याआधी एक ग्लास पाणी प्यायल्यास भूक कमी होते.

प्रथिने आणि फायबरयुक्त आहार घ्या– आहारात डाळी, अंडी, दही, दूध, कडधान्ये, भाज्या आणि फळांचा समावेश करा. प्रथिने आणि फायबर पोट दीर्घकाळ भरलेले ठेवतात.

जेवणाची वेळ ठरवून ठेवा– वेळ न ठरवता खाल्ल्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा होते. दिवसातून ३ मुख्य जेवण आणि २ हलके स्नॅक्स असा वेळापत्रक ठेवा.

रोज रताळे का खायला हवे, जाणून घ्या त्याचे आरोग्यवर्धक फायदे

अपुरी झोप टाळा– झोप कमी झाली की भूक वाढवणारे हार्मोन्स सक्रिय होतात. त्यामुळे रोज किमान ७–८ तासांची झोप आवश्यक आहे.

तणाव कमी करा– ताणतणावामुळेही जास्त खाण्याची सवय लागते. ध्यान, प्राणायाम, चालणे किंवा आवडता छंद जोपासल्याने तणाव कमी होतो.

जंक फूड आणि गोड पदार्थ टाळा -गोड आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने लगेच भूक लागते. त्याऐवजी फळे, भाज्या, भिजवलेले चणे किंवा सुकामेवा मर्यादित प्रमाणात घ्या.

दररोज केळी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या

हळूहळू आणि लक्ष देऊन खा– मोबाईल किंवा टीव्ही पाहत खाणे टाळा. शांतपणे चावून खाल्ल्यास लवकर पोट भरल्याचा संकेत मेंदूला मिळतो.

स्वतःला व्यस्त ठेवा – कंटाळा आला की खाण्याची इच्छा होते. अशा वेळी चालणे, वाचन, घरकाम किंवा हलका व्यायाम करा.

सवयींची नोंद ठेवा -केव्हा आणि का भूक लागते याची नोंद ठेवल्यास कारण ओळखता येते आणि त्यावर उपाय करणे सोपे जाते.