
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प नवनवीन निर्णय घेत आहेत. यात आता आणखी एका निर्णयाची भर पडली आहे. ट्रम्प यांनी एका नवीन घोषणेवर स्वाक्षरी केली असून 12 देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. तर 7 देशांमधून येणाऱ्या नागरिकांवर अंशत: बंदी घातली आहे. ‘इंडिया टूडे‘ने अमेरिकेतील स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेवर चिंता व्यक्त करत डोनाल्ड ट्रम्प यांनी 12 देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. यात अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, कांगो, इक्वेटोरियन गिनी, इरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुडान आणि येमेन या देशांचा समावेश आहे. या देशातील नागरिक आता अमेरिकेमध्ये प्रवेश करू शकणार नाहीत. सोमवार दुपारी 12 वाजून 1 मिनिटांपासून हा निर्णय लागू करण्यात आला आहे.
Trump signs order to ban travel to US from 12 nations, partially restricts entry of nationals from 7 nations
Read @ANI Story | https://t.co/a3umPTJ5Si#DonaldTrump #US #TravelBan pic.twitter.com/cUQVPAx1FA
— ANI Digital (@ani_digital) June 5, 2025
यासह 7 देशामधून येणाऱ्या नागरिकांवर अंशत: बंदी घालण्यात आली आहे. यात बुरुंडी, क्यूबा, लाओस, सिएरा लियोन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला या देशांचा समावेश आहे. या देशातील नागरिकांना अटी आणि शर्तींचे पालन करून अमेरिकेत प्रवेश दिला जाईल.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जगातील काही देशांवर अमेरिकेत प्रवेश बंदी लादण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळातही अशाच प्रकारचा निर्णय घेत इराक, सीरिया, इराण, सुडान, लिबिया, सोमालिया आणि येमेन या 7 मुस्लिम बहूल देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घातली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये ही बंदी उठवली होती.
ट्रम्पची साथ सोडताच, एलन मस्कची सरकारच्या धोरणांवर जाहीर टीका
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. कट्टरपंथी इस्लामिक दहशतवाद्यांना देशात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी आम्ही पुन्हा प्रवास बंदी लागू करू. यास सर्वोच्च न्यायालयानेही योग्य ठरवले आहे, असे ट्रम्प यांनी आपल्या निवेदनात म्हटले.