खोटं बोलल्याबद्दल पश्चाताप होतो का ? पत्रकाराच्या प्रश्नामुळे ट्रम्प उडाले

1268

‘खोटं बोलल्याबद्दल तुम्हाला पश्चाताप होतो का?’ असा प्रश्न जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये हा प्रकार घडला होता. हफिंग्टन पोस्टच्या एस.व्ही दाते यांनी हा प्रश्न ट्रम्प यांना विचारला होता.

दाते यांनी प्रश्न विचारला होता की ‘तुम्हाला अमेरिकेच्या लोकांशी खोटं बोलल्याबद्दल पश्चाताप होतो का हो ?’ या प्रश्नाने गोंधळलेल्या ट्रम्प यांनी दाते यांनी पुन्हा विचारलं ‘कोण बोललं ?’ यावर दाते यांनी म्हटले की ‘तुम्हाला…खोटं बोलल्याबद्दल’. दाते यांनी पुढे काही बोलायच्या आत ट्रम्प यांनी त्यांना तिथेच तोडले आणि पुढच्या पत्रकाराला प्रश्न विचारायला सांगितलं. दाते यांनी या प्रकाराबाबत बोलताना सांगितले की त्यांना ट्रम्प प्रश्न विचारण्याची संधी देतील असं वाटलंच नव्हतं.

दाते यांनी मार्च महिन्यात ट्रम्प यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाही ट्रम्प यांनी त्यांना थांबवलं होतं आणि प्रश्न विचारण्याची संधीच दिली नाही. मला त्यांनी बहुधा ओळखलं नसावं आणि म्हणून मला त्यांनी संधी दिली असावी असं दाते म्हणाले. भविष्यात मला पुन्हा प्रश्व विचारण्याची संधी मिळेल, आपण याबाबत आशावादी असल्याचे दाते म्हणाले. जुलै महिन्यामध्ये वॉशिंग्टन पोस्टने एक सविस्तर बातमी छापली होती ज्यात म्हटलं होतं की ट्रम्प यांनी 20 हजार वेळा खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती अथवा विधाने केली आहेत. ट्रम्प यांचे एकेकाळचे सहकारी असलेल्या मायकल कोहेन यांनी ट्रम्प यांना खोटारडे, फसवणूक करणारे, टारगट, वर्णद्वेषी असल्याची टीका केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या