
जगभरात सध्या अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफचा मुद्दा गाजत आहे. ट्रम्प यांनी हिंदुस्थानवरही 25 टक्के टॅरिफ आणि पेनल्टी लावली आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी रशिया आणि हिंदुस्थानने त्यांच्या अर्थव्यवस्थेसह रसातळाला जावे, असे विधान केले. त्यांचे हे विधान सत्य असल्याचे सांगत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहिल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. मोदी सरकार फक्त अदानी या एका व्यक्तीसाठी काम करत असून भाजपने अदानीसाठी देशाची अर्थव्यवस्था रसातळाला नेली आहे, असा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींवर हल्ला चढवला.
राहुल गांधी म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हिंदुस्थानची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे, असे सांगितले ते सत्य आहे. ट्रम्प म्हणाले ते खरे आहे. जनतेलाही ही माहिती आहे. फक्त पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांशिवाय सर्व जगाला हे समजले आहे. सर्वांना माहित आहे की भारतीय अर्थव्यवस्था मृत, रसातळाला गेलेली अर्थव्यवस्था आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी सत्य जगासमोर उघड केले, याचे समाधान आहे. भाजपने अदानी यांना मदत करण्यासाठी अर्थव्यवस्था संपवली आहे, असा घणाघातही त्यांनी केला.
पंतप्रधान मोदी फक्त एकाच व्यक्तीसाठी काम करतात, ती व्यक्ती म्हणजे अदानी. हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करार होईल आणि ट्रम्प यांना हवा आहे, त्यांच्या मनाप्रमाणेच होणार आहे. ट्रम्प जे सांगतील ते पंतप्रधान मोदी मान्य करतील.आज देशासमोर मुख्य मुद्दा हा आहे की अदानीसाठी सरकारने आपले आर्थिक, संरक्षण आणि परराष्ट्र धोरण उद्ध्वस्त केले आहे. ते या देशाला रसातळाला नेत आहेत, असेही राहुल गांधी म्हणाले. ट्रम्प यांनी 30-32 वेळा युद्धबंदी केल्याचा दावा केला आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की 5 भारतीय विमाने पडली आहेत. ट्रम्प आता 25% टॅरिफ लादला आहे. याबाबत पंतप्रधान मोदी त्यांना जाब का विचारत नाहीत? यावरून कोणाच्या हातात पंतप्रधानांचे नियंत्रण आहे, ते दिसून येते, असेही राहुल गांधी म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्य सांगितले, भाजपने अदानीसाठी देशाची अर्थव्यवस्था रसातळाला नेली; राहुल गांधींचा हल्लाबोल pic.twitter.com/9L7GtESWwI
— Saamana Online (@SaamanaOnline) July 31, 2025
परराष्ट्रमंत्री भाषण देतात आणि म्हणतात की आमची परराष्ट्र धोरण एक प्रतिभाशाली आहे. एकीकडे अमेरिका तुमचा गैरवापर करत आहे तर दुसरीकडे चीन तुमच्या मागे लागला आहे. जेव्हा तुम्ही जगाला तुमचे शिष्टमंडळ पाठवता तेव्हा कोणताही देश पाकिस्तानचा निषेध करत नाही. ते हा देश कशा पद्धतीने चालवत आहेत? सरकारमध्ये सर्वत्र गोंधळ आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात ट्रम्प, चीनचे नाव घेतले नाही. हा पहलगाम हल्ला करणाऱ्या पाकिस्तानच्या लष्करप्रमुखासोबत ट्रम्प मेजवान्या झोडतात आणि मोदी म्हणत आहेत, आम्हाला खूप मोठे यश मिळाले. नेमक्या कोणत्या यशाबाबत ते बोलत आहेत? असा सवालही राहुल गांधी यांनी केला.