
बारामतीत विमानाच्या अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले आहे. हा निव्वळ अपघात होता, यात राजकारण आणू नका असे आवाहन अजित पवार यांचे काका शरद पवार यांनी केले आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. शरद पवार म्हणाले की, अजित पवारांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड असा धक्का आहे. एक कर्तृत्ववान निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे, अशा व्यक्तीला महाराष्ट्र मुकला. जे काही नुकसान झालं ते भरुन निघणारं नाही. पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. हा अपघात होता. याच्यात राजकारण नाही, हा निव्वळ अपघात आहे. त्याच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपा करुन इथं राजकारण आणू नये असे शरद पवार म्हणाले.


























































