
>> राहुल गोखले ([email protected])
वेगवेगळ्या भाषांत व देशांत अनेक साहित्यकृती निर्माण होत असतात. त्यांतील सर्वच काही जागतिक स्तरावर दखल घेण्याच्या पात्रतेच्या नसल्या तरी अनेक श्रेष्ठ कलाकृती मात्र या सीमा ओलांडून आपले एक स्थान निर्माण करतात. अशा साहित्यकृतींचे बलस्थानच मुळी भाषा-भौगोलिक स्थिती यापलीकडे जाऊन केलेले भाष्य हे असते. कारण ते वाचकाला नवी दृष्टी देत असते. डॉ. प्रल्हाद कुलकर्णी यांनी यापूर्वीही विविध भाषांतील-देशांतील साहित्यकृतींचा परिचय करून देणारे लेखन केले आहे. `शब्दप्रभू’ हे त्यांचे नवे पुस्तक (प्रकाशक : रावा प्रकाशन) त्याच धाटणीचे आहे.
पुस्तकात लेखकाने पंचवीस साहित्यकृतींचा परिचय करून दिला आहे. यात जपानपासून कॅनडा, नायजेरियापर्यंत अनेक देशांतील लेखकांचा समावेश आहे. साहजिकच निवडलेल्या साहित्यकृतींचा व्याप व विस्तार यांची कल्पना येऊ शकेल. मात्र ही निवड लेखकाने केवळ वैविध्य राहावे एवढय़ाच मर्यादित हेतूने केलेली नाही. या लेखकांचे वैशिष्टय़ लेखकाने नमूद केले आहे. त्यापैकी काही नोबेल पुरस्कार विजेते आहेत, काही बुकर पारितोषिकाचे मानकरी आहेत. काही लेखकांचा काळ इसवी सन 1000 मधील आहे, तर काही कादंबऱयांची पार्श्वभूमी ही ऐतिहासिक काळातील आहे.
लेखकाने `दि टेल ऑफ गेंजी’ या जागतिक साहित्य इतिहासातील पहिली कादंबरी मानल्या जाणाऱया साहित्यकृतीच्या परिचयापासून पुस्तकाची सुरुवात केली आहे. हेअना काळाची पार्श्वभूमी असलेल्या या कादंबरीत मानवी मनातील भावभावना, मानसिक ताणतणावांचे दर्शन घडते याचा उल्लेख लेखक करतो. आयझॅक सिंगर यांच्या `दि स्लेव्ह’ या कादंबरीत यहुदी नायक व यहुदी नसणाऱया स्त्राrमधील प्रेमकथा रेखाटण्यात आली आहे. स्वत यहुदी असणाऱया लेखकाने यानिमित्ताने दोन भिन्न धर्मीयांमधील बंध, प्रेम, वासना इत्यादींचा वेध घेतल्याचे लेखक नमूद करतो. युकियो मिशिमा यांनी `दि साऊंड ऑफ वेव्हज्’मधून वयात येणाया मुलांच्या मनातील घालमेल, श्रीमंत-गरीब प्रेम यांच्यावर भाष्य केले आहे यावर लेखक प्रकाश टाकतो. याच ओघात `युकियो मिशिमा’ हे टोपण नाव घेतलेल्या लेखकाचे खरे नाव किमिटके हिराओका असल्याची आणि त्यांचा जन्म 1925 मधील असल्याची माहिती लेखक देतो. शंभर वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या लेखकाची कलाकृती अद्याप वाचकांना रुंजी घालते हे लेखक सूचित करतो. गॅब्रियल मार्क्विझच्या `नो वन राईट्स टू कर्नल’ या कृतीत पेन्शनची वाट पाहत बसणाऱया हतबल कर्नलची कथा आहे. सरकार वचन देऊनही ते पाळत नाही आणि कर्नलवर उपासमार होण्याची वेळ येते. माणसाचे स्वातंत्र्य हरवून गेले की, तो हतबल होऊन घडणाऱया घटनांचा मूक साक्षीदार कसा होतो याचे चित्रण करणाऱया या कादंबरीचे पैलू लेखक उलगडून दाखवितो. केन्झबुरो ओ यांच्या `दि सायलेंट ाढाय’मध्ये अठराव्या शतकातील उच्चभ्रू समाजाचे वर्णन येत असले तरी कथानकातून स्त्राrचे दुःख, तिच्या वेदना, तिच्यावरील अन्याय हे मानवतेला काळिमा फासणारे आहे याचा उल्लेख करून कथानक वाचताना मन आतून आांढदून निघते असा अभिप्राय लेखक देतो.
ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवाशांच्या जीवनाचे व गोऱया गुन्हेगारांच्या वसाहतीमुळे झालेल्या परिणामांचे चित्रण करणारी ाsढट ग्रीनविले यांची `दि पोट रिव्हर’, मानवशास्त्राrय अभ्यास म्हणून ज्याकडे पाहता येईल अशी डेव्हिड ग्रॉसमन यांची `दि हॉर्स वॉकस् इनटू दि बार’, आधुनिक रशियातील व विशेषत नव्वदच्या दशकातील नैतिक अधपतनाचा वेध घेणारी अँड्रय़ू मिलर यांची `स्नो ड्रॉप्स’, केवळ ऐंशी मिनिटेच स्मृती राहते अशा स्मृतीभ्रंशाने त्रस्त प्राध्यापक व त्याची काळजी घेणारी घरकाम करणारी स्त्राr यांची कथा चितारणारी विल्यम वुडवर्ड सेल्फ यांची `अंब्रेला’; मानवी फोलपणा, पोकळपणा यांची कथा सांगणारी आलिसन मूर यांची `दि लाईट हाऊस’ अशा अनेक कादंबऱयांचा रोचक परिचय लेखकाने करून दिला आहे. यांत घडणारी कथानके वेगवेगळ्या देशांतील, काळातील व परिस्थितीतील आहेत. मात्र एकूण मानवी भावभावना, स्वभावाचे कंगोरे हा समान धागा त्यात सापडतो व त्यामुळेच त्या कलाकृती जागतिक ठरतात.
लेखकाची निवेदन शैली उत्कंठावर्धक असल्याने मूळ कलाकृती वाचण्याची उत्सुकता वाचकाला अवश्य वाटेल. पुस्तकाला सोमनाथ कोमरपंत यांची सुमारे पंचवीस पृष्ठांची दीर्घ प्रस्तावना लाभली आहे, तीही वाचनीय. आपल्याकडील कादंबऱयांच्या परिघाच्या थिटेपणाकडे त्यांनी अंगुलिनिर्देश केला आहे तो महत्त्वाचा.
शब्दप्रभू
लेखक : डॉ. प्रल्हाद कुलकर्णी
प्रकाशक : रावा प्रकाशन
पृष्ठे : 181 ह मूल्य : 410 रुपये































































