
लंडनस्थित डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर उतरताच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अनेक तासांच्या चौकशीनंतर त्यांना आता सोडण्यात आलं आहे. सरकारविरोधात लिखाण केल्याने त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती. याच प्रकरणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं.
पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर डॉ. संग्राम पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना सांगितलं की, “मी फेसबुकवर सरकारविरोधात लिखाण करतो. सरकारच्या लोकांना काही पोस्ट आवडल्या नाहीत, यामुळे त्यांनी माझी तक्रार केली.” ते म्हणाले, “माजी दिवसभर चौकशी करण्यात आली. याला मी कायदेशीर पद्धतीनं लढा देईन.”

































































