डॉ. संग्रामसिंह माळी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन  

डॉ. संग्रामसिंह माळी यांचे  ‘द वर्ल्ड इज माय कंट्री’ हे पहिले पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे. पुस्तकाचे प्रकाशन येत्या 31 मे रोजी  मुंबईत होईल. ग्लोबल ह्युमॅनिटी सेंटर ही संकल्पना व ‘आध्यात्मिक दीपस्तंभ’ यावर आधारित असलेले हे पुस्तक जागतिक ऐक्य वाढविणाऱ्या विचारांना चालना देणारे आहे, असे डॉ. माळी यांनी म्हटले. अलीकडेच जागतिक पुस्तक दिनानिमित्त  अभिनेता शाहरुख खानच्या हस्ते या पुस्तकाचा प्री-लाँच सोहळा पार पडला होता.