तयार रहा! दृश्यम 3 येतोय!!

ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेल्या साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्या दृश्यम 2 या सिनेमाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. दृश्यम 2 च्या तुफान यशानंतर दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी दृश्यम 3 ची घोषणा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. दृश्यमची पुढची कहाणी दृश्यम 2 मध्ये पाहायला मिळाली होती. आता मात्र दृश्यम 3 मध्ये अनेक रहस्यांवरून पडदा हटणार आहे. तिसरा भाग हा या सिरिजमधील शेवटचा भाग असणार आहे.

याबाबत जीतू जोसेफ म्हणाले की, ‘दृश्यम 3’ला प्रत्यक्षात सुरुवात व्हायला कमीत कमी तीन वर्षे लागतील. सध्या स्क्रीप्टवर काम सुरू आहे. काही गोष्टी अजूनही स्पष्ट व्हायच्या आहेत. पहिल्या दृश्यमचा हिंदी रिमेक आला होता. त्यात अजय देवगण आणि तब्बू यांची मुख्य भूमिका होती. आता दृश्यम 2 च्या हिंदी रिमेकची बॉलीवूडमध्ये तयारी सुरू झाली आहे. कुमार मंगत आणि अजय देवगण यांनी निर्मिती हक्क बडय़ा किंमतीला विकत घेतले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या