
हरयाणातील सिरसा येथील एका ड्रायव्हरला चक्क 10 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. पृथ्वी सिंह असे या ड्रायव्हरचे नाव असून त्याने पंजाब स्टेट डियर लॉटरी (लोहड़ी मकर संक्रांति बंपर 2026) चे तिकीट खरेदी केले होते. गरीब कुटुंबात जन्मलेल्या पृथ्वीला थेट 10 कोटींची लॉटरी लागल्याची माहिती मिळताच त्याच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. त्याच्या कुटुंबाने ढोल-ताशे वाजवून, नोटांची माळ गळ्यात घालून त्याचे स्वागत केले. पृथ्वी सिंह हा राणियाजवळच्या मोहम्मदपुरिया गावाचा रहिवासी आहे. त्याच्या कुटुंबात पत्नी सुमन, मुलगी रितिका, मुलगा दक्ष आणि वडील देवीलाल आहेत. पृथ्वी मजुरीसोबत ड्रायव्हिंगचेही काम करतो. त्याची पत्नी सुमन जवळच्याच एका शाळेत शिपाई म्हणून कार्यरत आहे. पृथ्वी सिंह यांच्या घरी अभिनंदन करणाऱयांची रीघ लागली आहे. पृथ्वीला 10 कोटींपैकी 7 कोटी रुक्कम मिळणार आहे. 30 टक्के रक्कम लॉटरीच्या पैशांतून कपात केली जाईल. मिळालेल्या पैशांतून तो एक नवीन व्यवसाय सुरू करणार आहे असे पृथ्वीने सांगितले.


























































