
मुंबईच्या लालबाग परिसरात गणपती आगमन मिरवणुकीदरम्यान ड्रोन उडवण्यात आले या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन ड्रोन जप्त केले आहेत.
लालबागमध्ये एका मंडळाच्या बाप्पाचे आगमन होत होते. तेव्हा या मिरवणुकीचे ड्रोन द्वारे चित्रिकरण करण्यात येत होते. पोलिसांनी तातडीने हे ड्रोन ताब्यात घेऊन पाच जणांविरोधात गुन्हे दाखल केले.
काळाचौकी पोलिसांनी तीन ड्रोन पंचनाम्यानंतर जप्त केले आहेत. पोलिसांनी स्पष्ट केले की, परवानगीशिवाय ड्रोन उडवल्यास निश्चितच केली जाईल. सण आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या वेळी सर्वांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. सुरक्षेशी कोणताही तडजोड केला जाणार नाही असे पोलिसांनी सांगितले. तसेच कोणत्याही कार्यक्रमात किंवा उत्सवात सहभागी होण्यापूर्वी नियम व मार्गदर्शक सूचना नीट जाणून घ्या असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. नियमांचे पालन कराजेणेकरून सण आनंदाने आणि सुरक्षित वातावरणात साजरा करता येईल असेही पोलिसांनी म्हटले आहे.