
राज्य सरकारच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा आणि सेवाकर्मी कार्यक्रमाअंतर्गत सर्व विभागात 186.75 गुणांसह सार्वजनिक बांधकाम विभाग सर्वोत्तम ठरला आहे. सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित सोहळ्यात विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
ई-गव्हर्नन्स सुधारणा उपक्रमात उत्कृष्ट कार्य केलेल्या विभागांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उपक्रमात मंत्रालयातील 57 विभागांनी सहभाग घेतला होता. विविध विभागांच्या कामगिरीचे मूल्यमापन ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’कडून 127 निकषांवर करण्यात आले. यावेळी वन विभाग- मिलिंद म्हैसकर (अपर मुख्य सचिव), पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग-पराग जैन नैनुटिया (अपर मुख्य सचिव), परिवहन व बंदरे विभाग – संजय सेठी (अपर मुख्य सचिव), पर्यावरण व वातवारणीय बदल विभाग – जयश्री भोज (सचिव), शालेय शिक्षण विभाग – रणजीतसिंह देओल (प्रधान सचिव) वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग – धीरज कुमार (सचिव) यांचा सत्कार करण्यात आला.


























































