
ई–कॉमर्स कंपनी ईबे पुन्हा एकदा कर्मचारी कपात करणार आहे. यावेळी कंपनी 800 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. ही कर्मचारी कपात जवळपास 6 टक्के इतकी आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, बिझनेसमध्ये पुन्हा गुंतवणूक करणे आणि संघटनात्मक फेरबदल करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. कर्मचाऱ्यांनी कंपनीसाठी जे योगदान दिले आहे. त्याबद्दल त्यांचे आभार आहे. त्यांना सन्मानजनक निरोप देण्यासाठी कंपनी कटिबद्ध आहे.
31 डिसेंबर 2025 मध्ये कंपनीकडे जागतिक स्तरावर 12 हजार 300 कर्मचारी होते. कंपनी सध्या एआयवर जास्त फोकस करत आहे. ईबेने नुकतीच डेपॉपला जवळपास 1.2 अब्ज डॉलर किंमतीत खरेदी करण्याची घोषणा केली आहे.


























































