युवराज, सोनू सूद, उर्वशी रौतेलाची करोडोंची मालमत्ता ईडीकडून जप्त

  ईडीने  ‘1 एक्स बेट’ या बेटिंग अॅपशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणात अनेक सेलिब्रेटींची करोडोंची मालमत्ता जप्त केली. यामध्ये क्रिकेटपटू युवराज सिंग, रॉबिन उत्थप्पा, अभिनेता सोनू सूद, अंकुश हजारा, अभिनेत्री उर्वशी रौतेला, नेहा शर्मा, तृणमूलच्या माजी खासदार मिमी चक्रवर्ती आदींचा समावेश आहे. ईडीने  एकूण 7.93 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.