रैना, धवन यांच्या 11.14 कोटींच्या मालमत्तेवर टाच

टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सुरेश रैना व शिखर धवन यांच्या 11.14 कोटींच्या मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. बेटिंगशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. ‘वनएक्सबेट’ या ऑनलाइन बेटिंग साइटच्या विरोधात विविध राज्यांतील पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्या आधारे ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत चौकशी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून सुरेश रैनाची 6.64 कोटींची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक व शिखर धवनची 4.5 कोटींची स्थावर मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.