
आग्रा-लखनऊ महामार्गावर स्लिपर बस आणि ट्रकचा भीषण अपघात घडला. या अपघातात 8 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 19 प्रवाशी जखमी झाले आहेत. कन्नौज येथे शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. अनियंत्रित स्लिपर बस ट्रकला धडकल्याने हा अपघात घडला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
स्लिपर बसमध्ये एकूण 40 प्रवाशी होते. कन्नौज जिल्ह्यातील सकरावाजवळ आग्रा-लखनऊ महामार्ग क्र. 141 वर बसचालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित बस पाण्याच्या टँकरवर धडकली आणि पलटी झाली. बसमधील प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
स्थानिकांनी बसच्या काचा तोडून प्रवाशांना बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना सैफई मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले.