दाऊद इब्राहीमचा पत्ता मिळाला, ‘इथे’ लपून बसलाय कुख्यात गुंड

1658

दाऊद इब्राहीमचा खास हस्तक असलेल्या इजाज लकडावाला याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दाऊद इब्राहीम आणि त्याच्या टोळीसंदर्भातील नवनवी माहिती मिळायला सुरुवात झाली आहे. लकडावालाने दाऊद इब्राहीमचा पत्ताही पोलिसांना सांगितला आहे.

दाऊद इब्राहीम हा पाकिस्तानमध्येच असल्याचं लकडावालाने सांगितलं आहे. तो कराचीमध्ये रहात असल्याची माहिती लकडावालाने पोलिसांना दिली आहे. 6A, खयाबान तन्झीम, फेज-5, डिफेन्स हाऊसिंग वसाहत, कराची असा दाऊदचा पत्ता असल्याचं लकडावालाने सांगितलं आहे. दाऊदच्या दुसऱ्या घराचाही लकडावालाने पत्ता दिला आहे. हा पत्ता डी-13, ब्लॉक क्रमांक,  4, क्लिफ्टन, कराची असा आहे. 

आपली प्रतिक्रिया द्या