
राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांच्या मदतीसाठी राज्यभरात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष कार्यरत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नव्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची स्थापन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
देवेंद्र फडणवीस हे 2014 साली मुख्यमंत्री झाल्यानंतर वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली होती. या निधीच्या माध्यमातून राज्यातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत देण्यात येते. आता पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हा कक्ष मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाला जोडला. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत स्वतंत्र वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाची स्थापन करण्याची घोषण करून फडणवीस यांच्यावर राजकीय कुरघोडी केल्याची चर्चा आहे.