
मिंधे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. खुद्द शिरसाट यांनी ही कबुली दिली आहे. तसेच यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाही, असेही विधान शिरसाट यांनी केले आहे.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबात वृत्त दिले आहे. त्यानुसार संजय शिरसाट यांच्या मुलाने संभाजीनगरमध्ये विट्स हॉटेल विकत घेतले होते. त्याच प्रकरणी शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. पैसे कमावणे सोपे आहे. पण खर्च करणे कठीण, असे शिरसाट म्हणाले. तसेच यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाही असे म्हणत हे विधान आपल्यासाठीच आहे, असेही शिरसाट म्हणाले.
मिंधे पुन्हा दिल्ली दरबारी, अधिवेशन सोडून रात्री गुपचूप राजधानी गाठली
2019 साली तुमची संपत्ती एवढी होती ती 2024 साली एवढी कशी झाली अशी विचारणा आयकर विभागाने आपल्याकडे केल्याचे सांगितले. यावर आपण 9 जुलैला स्पष्टीकरण दिल्याचे शिरसाटांनी सांगितले.