अधिवेशन सोडून शिंदेंची रातोरात दिल्लीकडे धाव; मिटवामिटवीसाठी गाठीभेटी, पटवापटवी

महायुतीत गेल्या काही दिवसांपासून मिंधे गटाची कोंंडी सुरू आहे. त्यातच विधिमंडळाचे अधिवेशन सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रातोरात दिल्लीकडे धाव घेतली. शिंदे यांचा दिल्ली दौरा मिटवामिटवी आणि पटवापटवीसाठी असल्याची चर्चा आहे.

बुधवारी रात्री शिंदे यांनी गुपचूप दिल्ली गाठली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तसेच काही अधिकाऱ्यांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्या. खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस आल्याने शिंदे यांनी दिल्लीवारी केल्याचे बोलले जाते. शिंदे गुरुवारी दुपारपर्यंत दिल्लीतच होते.

शिंदे परतताच घुमजाव

मला जशी नोटीस आली तशी श्रीकांत शिंदे यांनाही आली आहे, असे सांगणाऱ्या मंत्री संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे दिल्लीहून परतताच घुमजाव केले.